
कौशल्य असलेल्या मुलांना जर्मनी येथे रोजगाराची संधी, रत्नागिरी जिल्ह्यातील तरूण-तरूणींनी नाव नोंदणी करावी
कौशल्य असलेल्या मुलांना जर्मनी येथे रोजगाराची संधी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासंबंधी महाराष्ट्र शासन व जर्मनी येथील बार्डन बुटेनबर्ग यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. लवकरच राज्यातील १० हजार मुलांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण देवून जर्मनी येथे पाठविले जाणार आहे. रोजगाराच्या या संधीचा लाभ घेण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील तरूण-तरूणींनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुशील शिवलकर यांनी केले आहे. जर्मनीसारख्या प्रगत देशामध्ये कुशल मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे. अशा युवकांना युरोपीयन देशांमध्ये नोकरी व रोजगाराच्या संधी उपलब्ध होवू शकतात हीच बाब लक्षात घेवून महाराष्ट्र शासनाने जर्मन देशातील बार्डन बुटेनबर्ग या राज्याशी करार केला आहे. राज्यातील कुशल मनुष्यबळ प्रशिक्षित करून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासंबधी ११ जुलै २०२४ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याचे शिवलकर यांनी सांगितले. www.konkantoday.com