
रत्नागिरी-दिवा पॅसेंजरच्या इंजिनमध्ये सावर्डे येथे बिघाड झाल्याने प्रवाशांचे हाल
एका बाजूला उन्हाळी सुट्ट्या तर खचाखच भरून जाणार्या रत्नागिरी-दिवा पॅसेंजर रेल्वेच्या इंजिनमध्ये चिपळूण स्थानकानजिक सावर्डे रेल्वे स्थानकामध्ये गुरूवारी सकाळी ६.४० वाजता बिघाड झाल्यामुळे ही पॅसेंजर तब्बल दोन तास रखडली. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले.अखेर सकाळी ९.३० वा. दुसरे इंजिन या पॅसेंजरला बसवल्यानंतर प्रवाशांनी खचाखच भरलेली ही पॅसेंजर रत्नागिरीहून दिव्याला रवाना झाली. तब्बल दोन तास ही रत्नागिरी दिवा पॅसेंजर सावर्डे स्थानकात थांबली होती. सावर्डे रेल्वे स्थानकातच रत्नागिरी दिवा पॅसेंजरच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने या दरम्यान कोकण रेल्वे मार्गावर कोणत्याही प्रकारची वाहतूक खोळंबली नसल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.www.konkantoday.com




