
अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. तोरल शिंदे.
अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात महिला विकासकक्षातर्फे विद्यार्थिनींसाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन केले. या प्रसंगी प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. तोरल शिंदे यांनी मासिक पाळी आणि शारीरिक व मानसिक स्वास्थ्य या विषयावर मार्गदर्शन केले.मासिक पाळीदरम्यान आपण कशी काळजी घ्यावी, आहार कसा असावा, नित्यनेमाने कोणत्या गोष्टी कराव्यात अथवा करू नयेत यावर डॉ. शिंदे यांनी मार्गदर्शन केले. समाजात वावरताना आपली मर्यादा ओळखून राहिलं पाहिजे. पालकांशी सुसंवाद साधला पाहिजे जेणेकरून तेच आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहतात, अशा अनेक महत्वाच्या विषयांवर डॉ. शिंदे बोलल्या. या प्रसंगी वाणिज्य विभागप्रमुख प्रा. शिल्पा तारगावकर व महिला विकास कक्षाचे सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग घेऊन डॉ. शिंदे यांच्याशी संवाद साधला