
शिवसेना ठाकरे गटाच ‘मिशन मुंबई’ वर लक्ष केंद्रीत
महाराष्ट्रातील 42 लोकसभा मतदारसंघातील शिव सर्वेक्षण अभियानानंतर शिवसेना ठाकरे गटानं ‘मिशन मुंबई’ वर लक्ष केंद्रीत केलं आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांची मोर्चेबांधणी करण्यासाठी नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. मुंबईतील 36 मतदारसंघांची जबाबदारी 18 नेते आणि 18 सहाय्यकांवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून आता मुंबईत शिव सर्वेक्षण अभियान राबवलं जाणार आहे.मुंबईतील शिव सर्वेक्षण अभियानासाठी प्रमुख नेत्यांची नियुक्तीविनायक राऊत यांच्याकडे वरळी, दादर- माहीमअनिल देसाईंकडे जोगेश्वरी आणि अंधेरीअनिल परबांकडे मागाठाणे, दहिसरराजन विचारे यांच्याकडे विलेपार्ले, कालिनामिलिंद नार्वेकरांकडे दिंडोशी, गोरेगावसुनील प्रभू – मुलुंड, भांडुपअजय चौधरींकडे चेंबूर, अणुशक्तीनगरसचिन अहिर यांच्याकडे कुलाबा, मुंबा देवीविलास पोतनीसांकडे शिवडी आणि मलबार हिलवरून सरदेसाईंकडे सायन कोळीवाडा, धारावीमुंबईतील शिव सर्वेक्षण अभियानासाठी प्रत्येक नेत्यावर दोन विधानसभा मतदारसंघात सर्वेक्षण करण्याची जबाबदारी सोपवली आहे. मुंबईसह इतर महाराष्ट्रातील सर्वेक्षण अहवाल 25 ऑगस्टला उद्धव ठाकरेंना सादर केले जाणार आहेत. त्यानुसार, आगामी विधानसभा निवडणुकांसाठी रणनिती आखली जाणार आहे.