
विनापरवाना उत्तेजक औषधे बाळगणार्या तरूणाविरूद्ध गुन्हा
रत्नागिरी शहरालगतच्या मिरजोळे एमआयडीसी येथे परवाना नसताना उत्तेजक औषधे बाळगणार्या संशयिताविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शुक्रवारी सायंकाळी उशिरा पोलिसांनी ही कारवाई केली. साईराज रमेश भाटकर (रा. मिरजोळे, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्या ताब्यातील ३ हजार ७०० रुपयांची औषधे पोलिसांनी हस्तगत केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपीने आपल्या मिरजोळे एमआयडीसी येथील घरामध्ये उत्तेजक औषधांचा विनापरवाना साठा करून ठेवला होता. तसेच ही औषधे वैद्यकीय अधिकार्यांच्या अथवा डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विक्री करण्यात येत होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार १६ ऑगस्ट रोजी पोलिसांनी साईराज याच्या घरी छापा टाकला. यावेळी साईराज याच्या घरामध्ये विविध उत्तेजक औषधांचा साठा आढळला. साईराज हा उत्तेजक औषधे नेमकी कोठून आणत होता तसेच त्याच्याकडे कोण खरेदीसाठी येत होते याची अद्याप माहिती समोर येवू शकली नाही. पोलिसांनी साईराज याच्याविरूद्ध भारतीय न्यायसंहिता कायदा कलम २७५, २७८, १२३, १२५ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.www.konkantoday.com