
रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील एसटीच्या कारभारामुळे विद्यार्थ्यांचे हाल
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील शाळकरी मुले नेहमीच एसटीच्या प्रतीक्षेत असतात. अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना मुलींचे तास चुकवू नयेत, म्हणून करण्यात आलेली आहे. परंतु मुलींनाच एसटीमध्ये घेतले जात नाही. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे पास अगोदरच काढले जातात. म्हणजेच महामंडळाला आधीच पैसे दिले जातात. तरीसुद्धा वाहक व चालक विद्यार्थ्यांना एसटीमध्ये घेत नाहीत. त्याचबरोबर रत्नागिरीहून पावस बसस्थानकामध्ये दुपारी बारा वाजता येणार्या गाड्या दोन वाजता किंवा चार वाजता येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची अक्षरशः परवड होते. ज्या योजना शासनाने विद्यार्थ्यांसाठी आणल्या त्या महामंडळामुळे फोल ठरत आहेत. www.konkantoday.com