
रत्नागिरी जिल्हा बँकेची भरती प्रक्रिया पारदर्शक सावधानता बाळगण्याचे आवाहन
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील अधिकारी, लिपिक, शिपाई पदासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. जिल्हा बँकेची भरती प्रक्रिया गुणवत्तेला पूर्ण संधी देणारी आहे. दिशाभूल टाळण्यासाठी अधिकृत संकेत स्थळावरील माहितीचा संपूर्णपणे अभ्यास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.पात्र उेमदवारांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. ९० गुणांसाठी ९० प्रश्न असून ते ९० मिनिटात ऑनलाईन पद्धतीने सोडवावयाचे आहेत. परीक्षेच्या तारखा, परीक्षा केंद्र, याबाबतची माहिती संकेत स्थळावरील तपशिलाच्या आधारे उमेदवारांनी अवलोकीत करावी. ऑनलाईन पद्धतीने होणारी ही परीक्षा उमेदवारांच्या गुणवत्तेला पूर्ण संधी देणारी आहे.उमेदवारांनी अधिकृत संकेत स्थळावरील माहितीवर विश्वास ठेवावा. अकारण अन्य ठिकाणी प्रसिद्ध होणार्या बातम्या, होणार्या चर्चा यामुळे उमेदवारांनी विचलित होवू नये. चुकीच्या माहितीमुळे उमेदवारांची दिशाभूल होवू नये. www.konkantoday.com