भोस्ते घाटात लोटे एमआयडीसी केमिकलने भरलेल्या टँकरला काही प्रमाणात गळती, वाहन चालकांना मोठ्या प्रमाणावर त्रास
लोटे एमआयडीसीमधील प्रदूषणाच्या वारंवार घटना घडत असूनही प्रशासन व संबंधित खाते त्याकडे दुर्लक्ष करीत आहे आता केमिकल वाहतूक करणाऱ्या टँकर मधून गळती होण्याचा प्रकार मुंबई गोवा महामार्गावर घडला आहे.मुंबई येथून केमिकलने भरलेला टँकर लोटे एमआयडीसीतील एका मोठ्या कंपनीत येत असताना भोस्ते घाटापासून केमिकलने भरलेल्या या टँकरला काही प्रमाणात गळती लागली, त्यामुळे संपूर्ण महामार्गावर मोठ्या प्रमाणात धूर पसरलेला पाहायला मिळाला.मुंबई -गोवा महामार्गावर तब्बल पंधरा ते वीस किलोमीटर या टँकरमधून विषारी वायूची गळती सूरू होती. महामार्गावर विषारी धूर पसरला, या केमिकलच्या संपर्कात आल्यामुळे अनेक वाहनचालकांना त्रास सुरू झाला. डोळ्याची जळजळ आणि श्वास घेण्यासाठी त्रास अशा समस्या निर्माण झाल्या.दरम्यान त्यानंतर काही वाहन चालकांनी या टँकरचा पाठलाग करून टँकर कोणत्या कंपनीमध्ये जात आहे याचा देखील शोध घेतला व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. ही घटना रविवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे