
गणेश विसर्जनासाठी रत्नागिरी शहरात नगर परिषदेतर्फे कृत्रिम तलावाची निर्मिती
गणेश विसर्जनाच्या वेळी गर्दी टाळण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेने विविध भागात कृत्रिम तलाव निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे त्या मध्ये नुतन नगर, उद्यान नगर, विश्व नगर, छत्रपती नगर, माळनाका, जोगळेकर कॉलनी उद्यान, नरहर वसाहत, उद्यान, लक्ष्मी चौक, प्रमोद महाजन क्रीडा संकुल आदी ठिकाणी कृत्रिम तलाव निर्माण करण्यात येणार आहेत याशिवाय रत्नागिरी शहरातील दैवज्ञ भवन नाचणे तलाव मच्छी मार्केट जवळील तळे आदी ठिकाणी तळ्यात देखील विसर्जनाची व्यवस्था करण्यात येणार आहे तसेच जे नागरिक गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात बाहेर पडू शकत नसतील अशा नागरिकांच्या गणेशमूर्तींचे घरोघरी जाऊन नगरपरिषदेच्या वतीने संकलन केले जाणार आहे व त्यांचे विसर्जन करण्यात येणार आहे यासाठी दीड दिवसाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी 22 ऑगस्ट पर्यंत पाच दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी 26 ऑगस्ट पर्यंत नगरपरिषदेच्या 222310 या हेल्पलाइनच्या ठिकाणी संपर्क साधून नोंदणी करणे आवश्यक आहे शहरातील मारुती मंदिर व जयस्तंभ येथे मूर्ती संकलन केंद्र उभारले जाणार आहे विसर्जनाच्या ठिकाणी निर्माल्य संकलन केंद्र देखील असणार आहे याबाबत नागरिकांनी शासनाचे नियम पाळून सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी केले आहे
www.konkantoday.com