
कोरोना प्रतिबंधक लस वाया जाण्याचे प्रमाण राज्यात सर्वाधिक पुण्यात pune vaccine
कोरोना प्रतिबंधक लस वाया जाण्याचे प्रमाण राज्यात सर्वाधिक पुण्यात आहे. त्याउलट पालघर, ठाणे, औरंगाबादेत ही लस वाया जाण्याचे प्रमाण अगदी कमी आहे. लस काही प्रमाणात वाया जात असली तरी ही फार चिंताजनक स्थिती नसून, एकूणच महाराष्ट्रात लस वाया जाण्याचे प्रमाण नगण्यच आहे. अनेक जिल्ह्यांत लस वाया जाण्याचे प्रमाण वजामध्ये (मायनस) आहे. कारण लसीच्या एका वायल्समध्ये १० ऐवजी ११ ते १३ डोस आले. परिणामी, अनेक जिल्ह्यांत अपेक्षेपेक्षा जास्त लसीकरण होत आहे
www.konkantoday.com