
प्रदूषित सांडपाणी नाल्यात सोडणार्या कारखान्यांचा शोध सुरू
काही दिवसापूर्व प्रदूषित सांडपाणी सीईपीटीऐवजी नाल्यात सोडणार्या लोटे औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांचा शोध प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाने सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर लोटे औद्योगिक वसाहत ते कोतवली खाडीपर्यंतच्या नाल्याची तपासणी करतानाच तेथील पाण्याचे तसेच संशयित कारखान्यातून बाहेर पडलेल्या सांडपाण्याचे नमुने घेत पुढील कार्यवाही सुरू केली आहे.मुंबई-गोवा महामार्ग ओलांडून सीईपीटीच्या बाजूने पुढे कोतवलीला मिळणार्या नाल्यात कारखानदारांनी सोमवारी आपले सांडपाणी सोडून दिले. त्यामुळे हा नाला लालसर रंगाच्या सांडपाण्याने वाहू लागला. यामुळे स्थानिक ग्रामस्थ, मच्छिमार यांनी आक्रमक होत प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि सीईपीटी यांच्याकडे तक्रार केली. यानंतर ह नाल्यातील सांडपाणी असल्याचे सांगत सीईटीपीने हात वर केले. तर उपप्रादेशिक अधिकारी संजय जिरापूरे, क्षेत्रिय अधिकारी सुशीलकुमार शिंदे यांनी संपूर्ण नाल्याची तपासणी केली. यावेळी तेथील पाण्याचे नमुने घेतानाच मच्छिमार व स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा केली.www.konkantoday.com