नेत्रावती एक्सप्रेस थांब्याचा 22 ऑगस्टला ‘नेत्र’दीपक सोहळा होणार साजरा
. संगमेश्वर -निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्ग रम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपच्या पुढाकाराने आणि सातत्याच्या पाठपुराव्याने संगमेश्वर वासीय जनतेच्या नेत्रावती एक्सप्रेस च्या संगमेश्वर थांब्याच्या मागणीला कोकण रेल्वेने हिरवा कंदील दाखवला आणि दिनांक 22ऑगस्ट 2023 रोजी पहिल्यांदा नेत्रावती एक्सप्रेस संगमेश्वर रोड स्थानकात थांबली.अनेक वर्षाच्या संगमेश्वर करांच्या या मागणीसाठी आम्हाला आपले आदरणीय आमदार श्री. शेखरजी निकम सर यांचे सहकार्य व मार्गदर्शन नेहमीच लाभले असुन आजवर प्रत्येक टप्प्यावर आम्हाला त्यांनी खंबीर साथ दिली. तसेच संगमेश्वर तालुक्यातील लोकप्रतिनिधी, मान्यवर, संगमेश्वर आणि देवरूख व्यापारी संघटना ,रिक्षा चालक-मालक संघटना, प्रवासी वर्ग, चाकरमानी वर्ग व पविविध गावाच्या ग्रामपंचायती, अनेक गावची गाव मंडळे, वाडीची मंडळे, समाजसेवक, आरोग्य सेवक, पोलीस यंत्रणा, शासकीय यंत्रणा, या सर्वांचे सहकार्य आम्हाला वेळोवेळी लाभले या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत 22 ऑगस्ट 2024 रोजी नेत्रावती एक्सप्रेस संगमेश्वर रोड थांबा ला एक वर्ष पूर्ण होत आहे या वर्षपूर्ती सोहळा साजरा करण्याचे ठरले असून आपले आमदार सन्माननीय शेखरजी निकम सर यावेळी उपस्थित राहणार असून त्याच बरोबर तालुक्यातील सर्व मान्यवर व संगमेश्वर वासीय जनता उपस्थित राहणार आहे.आपली साथ आम्हाला नेहमीच आम्हाला अधिक जोमाने काम करण्यासाठी बळ देते. यावेळीही आपण उपस्थित राहुन आमचा उत्साह वाढवावा असे आवाहन ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांनी केले आहे