
नितेश राणे गोबॅक अशी जोरदार घोषणाबाजी करत मराठा आंदोलकां कडून राणे यांना अडवण्याचा प्रयत्न
सकल हिंदू समाजाकडून इंदापूरमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात भाजप आमदार निलेश राणे सहभागी होणार होते. मात्र, त्यांच्या सहभागाला स्थानिक मराठा तरुणांनी विरोध केला होता.विरोध असताना देखील आज (रविवारी ) नितेश राणे इंदापूरमधील सकल हिंदू समाजाच्या मोर्चात सहभागी झाले.मोर्चात सहभागी होऊन काही अंतर चालत जात असतानाचा निलेश राणे यांना मराठा आंदोलकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. नितेश राणे गोबॅक अशी जोरदार घोषणाबाजी मराठा आंदोलकांनी करत राणे यांना अडवण्याचा प्रयत्न केला. घोषणा देणाऱ्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी पकडले.