तोंड सांभाळून बोला अन्यथा तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही,- मंत्री रवींद्र चव्हाण रामदास कदम यांच्यावर भडकले
रवींद्र चव्हाणांना आवर घाला , ते युती तोडण्याचं काम करत आहेत अशा शब्दांत रामदास कदम यांनी चव्हाणांवर निशाणा साधला होता. फडणवीसांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील कदम यांनी केली होती.मात्र त्यांच्या या टीकेमुळे रवींद्र चव्हाण भलतेच भडकले असून त्यांनीही रामदास कदम यांना थेट सुनावलं आहे. तोंड सांभाळून बोला अन्यथा तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत रवींद्र चव्हणांनी त्यांना इशाराचा दिला आहे.ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचा मेळावा झाला तेव्हा रामदास कदम यांनी चव्हाण यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे भाजप मंत्र्यांना घरचाच आहेर मिळाला होता. मात्र या टीकेनंतर रवींद्र चव्हाण प्रचंड संतापले असून त्यांनी रामदास कदम यांना खडे बोल सुनावत इशारा दिला आहे.बोलायला ना मलासुद्धा येतं. कधीतरी रस्त्यात समोरासमोर या.. अशा भाषेत मला बोलता येतं ना, कोणी वाचवायला देखील राहणार नाही. रवि चव्हाण आहे मी, थेट उत्तर देऊ शकतो, पण युतीधर्म पाळतोय त्याचा अर्थ असा नाही की कोणीही काहीही बोलेल आणि आम्ही ऐकून घेऊ. असं होणार नाही. एक लक्षात ठेवा, तोंड सांभाळून बोलायचं नाहीतर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, ‘ अशा शब्दांत रवींद्र चव्हाण यांनी रामदास कदम यांना इशारा दिला आहे.