जिल्हा शासकीय रूग्णालयात सध्या दोन महिने पुरेल इतका हिपॅटायटीस बी लसीचा पुरेसा साठा
हिपॅटायटीस बी या लसीची मोठी टंचाई महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यांमध्ये उदभवली आहे. हिपॅटायटीससाठी लसीकरण करून घ्यावे, यासाठी आरोग्य खात्याच्या पुढाकाराने व्यापक जनजागृती केली जात आहे, सध्या खासगी रूग्णालय आणि औषध विक्रेत्यांकडे या लसीची कमतरता असल्याची पहायला मिळत आहे. मात्र जिल्हा शासकीय रूग्णालयात सध्या दोन महिने पुरेल इतका लसीचा साठा असल्याचे सांगण्यात आले.खासगी तसेच सरकारी रूग्णालयांसमोर हिपॅटायटीस बी लसीची टंचाई असल्यामुळे उपचार व्यवस्था अडचणीत सापडली आहे. काही रूग्णांना शस्त्रक्रियेपूर्वी ही लस देणे आवश्यक असते. परंतु त्यांना ती देता येत नाही. जाणकारांच्या म्हणण्यानुसार लसनिर्मितीला कच्च्या मालाच्या कमतरतेचा मोठा फटका बसत आहे. ही टंचाई कमी अधिक प्रमाणात देशभर आहे. मात्र याबाबत जिल्हा शासकीय रूग्णालयात विचारणा केली असता रूग्णालयात पुढे दोन महिने पुरेल इतका लसीचा साठा असल्याचे सांगण्यात आले. www.konkantoday.com