
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आयी गाव लवकरच देशाच्या नकाशावर हस्तकलेतील आदर्श गाव म्हणून झळकणार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हस्तशिल्प कलेतील आदर्श गाव म्हणून आयी (ता. दोडामार्ग) गावाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे. त्यामुळे आयी गाव लवकरच देशाच्या नकाशावर हस्तकलेतील आदर्श गाव म्हणून नक्कीच झळकणार आहे. राज्य शासनाकडून तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला आहे.
तालुक्यातील आयी गावात माती कामाची पारंपरिक कला आजही मनोभावे जोपासली जात आहे. त्यामुळे राज्याच्या महाराष्ट्र वस्त्रोद्योग व हस्तशिल्प विभागामार्फत आयी गाव हस्तशिल्प कलेसाठी आदर्श गाव म्हणून प्रस्तावित केला आहे. प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे. लवकरच तो प्रस्ताव मंजूर होईल,
www.konkantoday.com