
आता मास्क विसरा ,आयआयटी दिल्लीने मास्कच्या ऐवजी एअर प्युरिफायर लॉन्च केला
कोरोना महामारीमुळे फेस मास्कचा सर्वाधिक वापर केला जात आहे. परंतु, आता आयआयटी दिल्लीने मास्कच्या एक पाऊल पुढं टाकलं आहे आणि एक एअर प्युरिफायर लॉन्च केला असून तो खूपच लहान आहे.हा थेट नाकात लावता येतो आणि त्यामुळे शुद्ध श्वासासोबतच कोरोनासारखे विषाणूही टाळता येतात. IIT दिल्लीच्या स्टार्ट-अप Nanoclean ने Naso-95 (Naso-95) लाँच केला आहे. विशेष म्हणजे हा जगातील सर्वात लहान वेअरेबल एअर प्युरिफायर आहे.
नॅनोक्लीन ग्लोबल, आयआयटी दिल्लीच्या स्टार्ट-अपने बनवलेला हा एअर प्युरिफायर N95 ग्रेड फेस मास्कसारखा प्रभावी आहे. आयआयटी दिल्लीतील डॉक्टर आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा लॉन्च करण्यात आला. Naso 95 हे N-95 ग्रेडचे नाकपुड्यांचा फिल्टर आहे. हा वापरणाऱ्याच्या नाकाला चिकटून राहतो आणि बॅक्टेरिया, विषाणू, परागकण आणि कसलंही वायू प्रदूषण श्वासातून फुफ्फुसात जाण्यास प्रतिबंधित करतं. कोरोना सारख्या विषाणूंवरही हा N-95 ग्रेड फेस मास्कइतकाच प्रभावी आहे. 5 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुले देखील हा एअर प्युरिफायर वापरू शकतात.
Naniclone द्वारे सांगण्यात आले की, Naso-95 हा एअर प्युरिफायर सामान्य फेसमास्क किंवा लूज फिटिंग फेस मास्कपेक्षा सुरक्षित आहे. या उत्पादनाची सुरक्षितता आणि परिणामकारकता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रयोगशाळांनी तपासली आहे.
www.konkantoday.com