
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी ऑन फिल्ड,मार्ग मोकळा करण्यासाठी स्वतः पुढे सरसावले
रत्नागिरी जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.जिल्ह्यातील दापोली व मंडणगड या तालुक्यांमध्ये फार मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी झाडे रस्त्यात पडली आहेत. त्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.प्रशासन मार्ग मोकळा करून वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे.जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आपलं कर्तव्य बजावण्यासाठी स्वतः दापोलीमध्ये पाहणी करत आहेत तसेच यंत्रणेला मदत करत आहेत.अश्याच एके ठीकाणी एका मार्गावर मोठे झाड रस्त्यावर पडले होते त्यामुळे वाहतूक खोळंबली होती.जिल्हाधिकारी श्री लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी स्वतः मशीन घेऊन झाड कटिंग सारख्या मदत कार्यात सहभाग घेतला.त्यांच्या समवेत पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे हे देखील या कार्यात सहभागी झाले होते.अशा अनेक मार्गांवर वादळामुळे झाडे पडुन मार्ग बंद झाले होते.हे मार्ग खुले करण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पुढाकार घेतला.वरिष्ठ अधिकारी जातीने उपस्थित राहिल्यामुळे कर्मचाऱयांमध्ये देखील उत्साह निर्माण झाला.