वीज कंत्राटी कामगारांचे राज्यभर साखळी उपोषण सुरू
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाच्या वतीने राज्यातील वीज उद्योगातील महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील वीज कंत्राटी कामगारांचे सोमवारपासून राज्यभर साखळी उपोषण सुरू झाले असून रत्नागिरीमध्ये देखील रत्नागिरी परिमंडळ अंतर्गत कोकण परिमंडळ या मुख्य कार्यालयाबाहेर या कंत्राटी कामगारांनी साखळी उपोषण सुरू केले आहे.वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांना एनएमआर पद्धतीनुसार किंवा हरियाणा सरकार प्रमाणे कंत्राटदार विरहीत रोजगार व पगारवाढ मिळावी. यासाठी १२ ते १७ ऑगस्ट दरम्यान साखळी उपोषण राज्यभर सुरू करण्यात आले आहे.www.konkantoday.com