लसणाचा काळाबाजार करणाऱ्यांनी अजब शक्कल , सिमेंटच्या लसणीचा वापर

लसणाचा काळाबाजार करणाऱ्यांनी अजब शक्कल लढवत नागरिकांची फसवणूक करण्याचं काम सुरू केलं आहे.अकोला शहरातील बहुतांश भागात फेरीवाले रोज भाजीपाला विक्रीसाठी येत असतात. यातल्याच काही फेरीवाल्यांकडे डुप्लिकेट लसूण विक्री करत असल्याचं दिसून येत आहे. अकोला शहरातील बाजोरिया नगर परिसरात राहणाऱ्या पोलीस विभागातून सेवानिवृत्त झालेल्या सुभाष पाटील यांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.सुधाकर पाटील यांच्या पत्नीने त्यांच्या घरासमोर आलेल्या फेरीवाल्याकडून एक पाव लसूण विकत घेतला. भाजी करताना लसूण वापरण्यासाठी घेतला असता यामधील एक लसणाची गाठ ही हुबेहूब ओरिजनल लसणासारखी आर्टिफिशियल पद्धतीने सिमेंटचा वापर करून बनवली असल्याचं दिसून आलं. लसूण सोलताना त्याच्या पाकळ्या वेगळ्या होत नव्हत्या त्यामुळे लसणाच्या गाठीला चाकूच्या सहाय्याने कापलं असता ही गाठ सिमेंट पासून बनवल्याचं त्यांच्या लक्षात आलं.सिमेंटपासून बनवलेल्या या डुप्लिकेट लसणावर पांढऱ्या रंगाचा वापर सुद्धा करण्यात आला आहे. अकोला शहरामध्ये सध्या लसणाचे भाव हे 300 ते 350 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचले असून लसणाचा काळाबाजार करणाऱ्या टोळ्या बाजारपेठेत सक्रिय झाल्या आहेत. या टोळ्या फेरीवाल्यांच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button