रोटरी व रोटरॅक्ट क्लब आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत खुशी हसे, स्वराज जोशी प्रथम
पल्स पोलिओ निर्मूलन जनजागृतीसाठी रोटरी व रोटरॅक्ट क्लबने आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत 450 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.खुला गटामध्ये खुशी हसे महिलांमध्ये तर स्वराज संदीप जोशी याने पुरुष गटात प्रथम क्रमांक पटकावला.या स्पर्धेचे उद्घाटन शैलेश टाकळे यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. १२ वर्षाखालील मुले पार्थ अनिल पवार, वेदांत नितीन खेराडे, नयन सदाशिव बुरटे. मुली ः मानवी शिगवण, भाविका सिकंदर शिंदे, रिद्धी सुनील भालेकर. १३ ते १५ वयोगटातील मुले वीर पांडुरंग मेटकर, रोहन उद्धव राठोड, प्रांजल दशरथ आंबेडे, मुली ः अनुजा निलेश पवार, हुमेरा हुमायून सय्यद, हर्षदा अनंत जोशी. महिला खुला गट खुशी सोमनाथ हसे, कोमल दीपक मोहिते, सिद्धी संतोष इंगवले, पुरुष ः स्वराज संदीप जोशी, ओंकार विष्णू बंकर, सिद्धेश पांडुरंग बर्जे. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण चिपळूण नगरपालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या हस्ते झाले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रोटरी अध्यक्ष अविनाश पालशेतकर, सचिव राजेश ओतारी, खजिनदार स्वप्निल चिले, रोट्रॅक्ट अध्यक्ष ओंकार ओतारी, सचिव अक्षय ओतारी, प्रशांत देवळेकर यांच्या नेतृत्वाखाली झाले.