रत्नागिरी तालुक्यातील गोळप डोंगरवाडी येथील तरुणाचा उंदिर मारण्याचे विष सेवन केल्याने मृत्यू
रत्नागिरी तालुक्यातील गोळप डोंगरवाडी येथे उंदिर मारण्याचा विषारी पदार्थ सेवन केल्याने तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. सुदेश प्रकाश डोंगरे (३३, रा. गोळप, डोंगरवाडी) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद पूर्णगण पोलीस ठाण्यात करण्यात आली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुदेश डोंगरे याने कोणत्या तरी अज्ञात कारणातून १२ ऑगस्ट रोजी उंदिर मारण्याचा विषारी पदार्थ सेवन केला. यावेळी त्याला अत्यवस्थ वाटू लागल्याने नातेवाईकांनी उपचारासाठी जिल्हा रूग्णालय येथे दाखल केले. सुदेशवर उपचार सुरू असताना रात्री १.३० च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला, अशी नोंद करण्यात आली आहे.www.konkantoday.com