
बँक ऑफ महाराष्ट्राच्या खेर्डी शाखेत व्हॅल्यूअर व आरोपीनी संगमताने केली साडेसहा लाखांची फसवणूक
बँक ऑफ महाराष्ट्राच्या खेर्डी चिपळूण शाखेत नेमलेल्या अधिकृत व्हॅल्यूअरने आरोपींची संगनमत करून बँकेत सोन्याचे खोटे दागिने गहाण ठेऊन बँकेची साडेसहा लाखांची फसवणूक करण्याचा प्रकार घडला आहे.
यातील आरोपी हनुमंत शेडगे हे बँक ऑफ महाराष्ट्राच्या खेर्डी शाखेचे अधिकृत व्हॅल्युअर आणि एजंट आहेत त्यांनी कर्जदार आरोपी साै.ललिता नामदेव पवार व रवींद्र श्रीरंग पवार राहणार खेर्डी चिपळूण यांचे बरोबर संगनमत केले. आरोपी पवार यांनी कर्जापोटी बँकेत खोटे दागिने गहाण ठेवले व त्या मोबदल्यात बँकेकडून व्याज धरून साडेसहा लाख रुपये उचलले. प्रत्यक्षात सोन्याचे दागिने दाखवून खोटे दागिने ठेवून बँकेची साडेसहालाख रुपये रक्कम व्याज मिळून फसवणूक केली.हा प्रकार फेब्रुवारी ते मे या दरम्यान घडला होता.हा प्रकार आता लक्षात आल्यावर महाराष्ट्र बँकेचे पणजी गोवा येथील विभागीय प्रबंधक अतुल जोशी यांनी तिघा आरोपींच्या विरोधात चिपळूण स्थानकात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे.
www.konkantoday.com