देव, घैसास, कीर कॉलेजचेविकसित भारतावर भित्तीपत्रक
भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या भित्तीपत्रक विभागाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे भारत शिक्षण मंडळ मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार साळवी आणि संस्था कार्याध्यक्षा नमिता कीर यांनी केले.भित्तीपत्रकासाठी विकसित भारत २०२४ या संकल्पना घेतली होती. शुभम पावसकर याने विकसित भारतासंबंधीची प्रतिकृती सादर केली. श्री. साळवी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. नमिता कीर यांनीही भित्तीपत्रकासाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयातील स्तरावरील युवकांना विचार मांडण्यासाठी हे भित्तीपत्रक हा एक नावीन्यपूर्ण आणि लक्षवेधी मुक्त व्यासपीठ आहे.भित्तीपत्रक विभगाकडून पोस्टर मेकिंग स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. यात प्रथम क्रमांक महेश्वरी नांदगावकर हिने पटकावला. द्वितीय गंधर्व बेलवलकर, तृतीय अनुष्का नागवेकर आणि समृद्धी बोरकर, उत्तेजनार्थ विधी कामत आणि कौशल लालीकर यांनी यश मिळवले. या विद्यार्थ्यांचे अभिनंदन प्र. प्राचार्या मधुरा पाटील यांनी केले. प्रा. वीणा कोकजे यांनी मानले.