करदात्यांनो, रिफंड बाबत ई-मेल, मेसेज येत आहेत? नव्या स्कॅम पासून सावधान!!

IT Refund Scam : प्राप्तिकर भरल्यानंतर अनेक करदाते हे प्राप्तिकर परताव्याची वाट पाहत आहते. अनेकांना अद्याप परतावा मिळालेला नाही. प्राप्तिकर खात्याला जोडलेल्या बँक खात्याचे व्हेरिफिकेशन करण्यासाठी प्राप्तिकर खात्याकडून काही जणांना ईमेल गेले आहेत. याच त्रुटीचा फायदा घेत आता सायबर चोरटे सक्रिय झाले आहेत. अनेक करदात्यांना आता ईमेल आणि मेसजद्वारे प्राप्तिकर परताव्याच्या नावाखाली (Tax Refund) गंडवले जात आहे. प्राप्तिकर विभागानेच आता याबद्दल जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला असून करदात्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.*उत्पन्नावरील प्राप्तिकर भरण्याची शेवटची मुदत ३१ जुलै होती. कोट्यवधी भारतीयांनी या मुदतीच्या आत कर भरलेला आहे किंवा आपल्या उत्पन्नाची माहिती प्राप्तिकर विभागाला दिली आहे. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात प्राप्तिकर परतावा दिला जात असतो. अद्याप अनेकांना परतावा आलेला नाही. त्यानंतर सायबर चोरट्यांनी करदात्यांच्या बँक खात्यावर डल्ला मारण्यासाठी नवी शक्कल लढविली. याबद्दल आता प्राप्तिकर खात्याने परताव्याबद्दल कोणताही मेसेज किंवा ईमेल आल्यास त्याला उत्तर न देण्याचे आवाहन केले आहे.*प्राप्तिकर विभागाने काय म्हटले?*प्राप्तिकर विभागाने एक्सवर पोस्ट टाकून करदात्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले, “करदात्यांना ईमेल, मेसेज किंवा फोन कॉलद्वारे कर परताव्याबद्दल एखादा संदेश आला तर त्याला उत्तर देऊ नये. तसेच क्रेडिट कार्ड किंवा बँक खात्याचा तपशीलही देण्याची गरज नाही. प्राप्तिकर विभागाला जर करदात्याशी संपर्क साधायचा असेल तर तो अधिकृत ईमेलद्वारे करदात्यांनी दिलेल्या ईमेलवरच संपर्क साधला जातो.”ऑनलाइन धोखाधड़ी से सावधान रहें pic.twitter.com/UtGD7QAWLG— Income Tax Mumbai (@IncomeTaxMum) August 15, 2024सायबर चोरट्यांकडून पाठविला जाणारा बोगस संदेश कसा असतो. याचाही एक नमुना देण्यात आला आहे. “तुम्हाला रुपये १५,००० इतका कर परतावा मिळणार आहे. ही रक्कम लवकरच तुमच्या खात्यावर जमा होईल. तुमचा बँक खाते क्र. ५XXXXX७३४५ पडताळून पाहावा. जर खाते क्र. चुकीचा असेल तर खालील लिंकवर क्लिक करून तुमचा योग्य खाते क्र. अपडेट करावा”, अशा माहितीचे मेसेज काही जणांना पाठवले जात आहेत.*फसवा संदेश आल्यानंतर काय कराल?*करदात्यांना जर असे फसवे संदेश किंवा फोन कॉल आले तर काय करावे? याच्याही सूचना दिल्या आहेत. जर करदात्यांना अशाप्रकारचे फसवे संदेश आले तर त्यांनी ते webmanager@incometax (.) gov (.) in वर पाठवून द्यावेत. तसेच जर ईमेलद्वारे संदेश आला असेल तर तो ncident@cert-in (.) org (.) in वर पाठवावा, असे प्राप्तिकर विभागाकडून सांगण्यात आले आहे.तसेच प्राप्तिकर विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाशिवाय इतर संकेतस्थळाचा ईमेल आल्यास आणि त्यात कर परताव्याबाबत कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यास सांगितले असेल तर अशा लिंकवर क्लिक करू नका, असेही सुचित करण्यात आले आहे. तसेच करदात्यांनी आधार, ओटीपी आणि पासवर्ड अशी संवेदनशील माहिती कोणत्याही लिंकवर भरू नये, असेही सांगण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button