
आमदार शेखर निकम यांनी गोवळकोट पर्यटन जेटीची केली स्वखर्चाने दुरूस्ती
चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदी किनार्यावरील गोवळकोट धक्क्यावर पर्यटकांसाठी बांधलेल्या इमारतीवरील पत्र्याचे पूर्ण छप्पर अलिकडच्या वादळात उडून गेले होते. ग्लोबल चिपळूण टुरिझम संस्थेने ही बाब आमदार शेखर निकम यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी तांत्रिक कारणाने शाासकीय निधी खर्च करता येत नसल्याचे पाहून स्वखर्चाने दुरूस्ती करत ही इमारत पुन्हा पर्यटकांसाठी खुली करून दिली आहे. www.konkantoday.com