
बैल उधळल्यानेचिमुरडीसह चौघे गंभीरहेदली येथे बैलगाडा शर्यतीवेळी प्रकार
बैलगाडा शर्यत सुरू झाल्यानंतर अचानक एक बैल उधळल्यामुळे प्रेक्षक गॅलरीत शिरला.त्यामुळे प्रेक्षक गॅलरीत गोंधळ उडाला आणि एका चिमुरडीसह चौघेजण गंभीर जखमी झाले. खेड तालुक्यातील हेदली येथे हा प्रकार घडला. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात अद्यापही कोणतीही नोंद नसल्यामुळे अधिक माहिती मिळू शकलेली नाही.
हेदली येथे एका राजकीय पक्षाच्यावतीने आज बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. शर्यत पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थ आले होते. शर्यत सुरू होताच अचानक एक बैल उधळला आणि तो प्रेक्षकांच्या गॅलरीत शिरला. त्यामुळे प्रेक्षक गॅलरीत गोंधळ उडाला. पळापळीत एका चिमुरडीसह चौघे गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर तत्काळ घटनास्थळी असलेल्या रुग्णवाहिकेतून जखमींना रुग्णालयात दाखल केले.
www.konkantoday.com