
राजापूर येथे आणखी एक फसवणुकीचा प्रकार
आपण सरकारी अधिकारी असून माझी वरिष्ठांपर्यंत चांगली ओळख आहे. त्यामुळे मी आपणाला तुरूंग किंवा न्यायालयात नोकरी मिळवून देतो असे एका भामट्याने सांगून राजापूर रेल्वे स्थानक परिसरात पंधरा दिवस वास्तव्य करून तेथील काही तरूणांची आर्थिक फसवणूक केली असल्याचे उघड झाले आहे. मात्र पोलीस स्टेशनचा आपल्या पाठिमागे ससेमिरा नको म्हणून कोणत्याही तरूणाने तक्रारीसाठी पोलीस स्थानक गाठले नाही असे समोर आले आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी तो भामटा फरार झालेला असून त्याच्याशी कोणताही संपर्क होत नाही अशा प्रतिक्रिया आहेत.राजापूर रोड रेल्वे स्थानकाशी निगडीत अधिकारी असल्याचे भासवत त्याने तेथे लगतच एक खोली भाड्याने घेतली. त्याचवेळी नजिकच्या कुटुंबियांकडे महिना पाच हजार रुपये देण्याच्या बोलीवर खानावळ लावली. दरम्यान त्याने एका एका तरूणावर जाळे टाकण्यास सुरूवात केली. आपण एका शासकीय कार्यालयात अधिकारी असून मी कोणालाही चुटकीसरशी कामाला ठेवू शकतो. हे करीत असताना त्याच्या बोलण्यातून विसंगती जाणवत होती. तरीसुद्धा काही तरूण त्याच्या जाळ्यामध्ये फसले गेले. त्यांनी एका तरूणाच्या चक्क वैभववाडी, कुडाळ, ओरोस व वेेंगुर्ला अशा वार्या केल्या. त्यावेळी त्याला लांबूनच जंगलाकडे बोट दाखवून तेथे तुरूंग असून तेथे तुला कैद्यांची राखण करावी लागणार आहे. तर काहींना न्यायालयात नोकरी मिळवून देतो अशाही बतावण्या केल्या. बोलण्यात विसंगती असतानाही नोकरीच्या गरजेपोटी काही तरूण त्याच्या पाठीपुढे करू लागले. www.konkantoday.com