रत्नागिरी जिल्ह्यातील सरकारी डाॅक्टरांची सेवा रहाणार बंद
रत्नागिरी -आज सरकारी डॉक्टरांचा बंद असून इंडियन मेडिकल असो.ने या बंद मध्ये सहभाग घेतला आहे. जिल्हयातील वैद्यकीय अधिकारी बंद मध्ये सहभाग घेतील. रत्नागिरी सर्वसाधारण रूग्णालयात उद्या बाह्य रूग्ण विभाग बंद राहण्याची शक्यता आहे. अत्यावश्यक रुग्ण सेवा सुरु असेल. वैद्यकीय महाविद्यालयात काळी फीत लावून कामकाज चालेल, असे अधिष्ठाता रामानंद यांनी सांगितले कोलकाता येथील सरकारी रुग्णालयातील ट्रेनी डॉक्टरसोबत अत्याचार आणि हत्या केल्यावर देशभरात निषेध आणि आंदोलने सुरु आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने देखील याबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. 17 ऑगस्ट रोजी 24 तास देशव्यापा बंदची घोषणा केली आहे. त्यामुळे देशभरातील सर्व वैद्यकीय सेवा बंद असतील. डॉक्टरांनी एका निवेदनात नमूद केले आहे की, अत्यावश्यक सेवा सुरू असतील. ओपीडी सेवा बंद असतील आणि काही शस्त्रक्रिया देखील बंद ठेवल्या जातील.