मूळच्या रत्नागिरीतील तरुणाचा कोल्हापूर नजीक अपघातात मृत्यू
रत्नागिरी येथील तरूणाचा कोल्हापूर येथे टँकरच्या धडकेत अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवार 16 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली. कृष्णात खेमराज बेगडा ( ३० मूळ गाव रत्नागिरी सध्या रा. बालिंगे ता. करवीर) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.सविस्तर वृत्त असे की, कृष्णात हा आपल्या दुचाकीवरून सकाळी ८ च्या सुमारास दोनवडे येथील हॉटेलकडे निघाला असता कोल्हापूरकडून येणाऱ्या गोकुळसाठी दूध आणणाऱ्या टँकरने (एम एच ०९ जीजे ४१४९) त्याला समोरासमोर धडक दिली. या धडकेत कृष्णात हा जागीच ठार झाला. तुमच्या रत्नागिरी येथील राहणारा कृष्णात हा महादेव प्रसाद हॉटेल, दोनवडे येथे कुक म्हणून काम करतो. खुपीरे ग्रामीण रुग्णालयातील कार्यरत मावस भावाकडे तो आला होता. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली