
चिपळुणात उद्या शिवपुतळा, नारायण तलावाचे लोकार्पण
चिपळूण शहरातील मार्कंडी परिसरात साकारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा व नारायण तलाव या दोन प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते उदघाटन होणार्या या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजना, जिल्हास्तर नगरोत्थान योजना व खासदार रविंद्र वायकर यांच्यामार्फत उपलब्ध करून दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण व शिवसृष्टी उभारणे, महाराष्ट्र शासनाच्या राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत नारायण तलावाचे सुशोभिकरण करणे, या कामांचा भव्य लोकार्पण सोहळा नगर परिषदेतर्फे रविवारी होत आहे.www.konkantoday.com