खरवतेत सह्याद्री शिक्षण संस्थेच्या नर्सिंग कॉलेजला मान्यता
कोकणातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सर्व सोयीसुविधा कोकणातच उपलब्ध व्हाव्यात व तरूणाईचे भविष्य उज्ज्वल व्हावे या उद्देशाने सुरू झालेल्या सह्याद्री शिक्षण संस्थेने आजपर्यंत इंजिनिअरिंग, कृषि, कला, वाणिज्य, विज्ञान यासारख्या उच्च शिक्षणाची दालने सुरू केली आहेत व त्याचा लाभ जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना मिळत आहे. ज्योत ज्ञानाची दौलत राष्ट्राची या ब्रीदवाक्याने प्रेरित होवून स्व. गोविंदराव निकम यांनी स्थापन केलेल्या या सह्याद्री शिक्षण संस्थेत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन या वैद्यकीय शिक्षणाची सुरूवात खरवते-दहिवली या ठिकाणी होत आहे.आयुक्त वैद्यकीय शिक्षण मुंबई यांनी नुकतीच सह्याद्री शिक्षण संस्थेची सक्षमता तपासणी केली. या तपासणीमध्ये नर्सिंग कॉलेजसाठी आवश्यक इमारत, फर्निचर, पुरेसे क्रीडांगण, ग्रंथालय, विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या आवश्यक इत्यादी सर्व बाबींबाबत तपासणी पथकाने समाधान व्यक्त केले. www.konkantoday.com