
आ. जाधव यांच्या प्रयत्नाने कामथे खुर्द व बुद्रूक दोन्ही गावांना ग्रॅव्हीटी पाणी योजना मंजूर
कामथे खुर्द व कामथे बुद्रूक या दोन्ही गावांसाठी मंजूर असणारी ग्रॅव्हीटीची नळपाणी योजना काही कारणास्तव रद्द करण्यात आली होती. परंतु भविष्याचा विचार करता ही योजना होणे आवश्यक असल्याचे दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी शिवसेना नेते, आमदार भास्करराव जाधव यांच्या निदर्शनास आणून दिले व आपण त्यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती केली होती. त्यानुसार आ. जाधव यांनी प्रयत्न करून या दोन्ही गावचा पुन्हा ग्रॅव्हीटी पाणी योजनेत समावेश करून घेतल्याने ग्रामस्थांची गाव भेट दौर्याच्यावेळी आ. जाधव यांचे आभार मानून त्यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. दोन्ही गाव मिळून सदैव आपल्या पाठिशी राहू अशी ग्वाही ग्रामस्थांनी दिली.www.konkantoday.com