आरे वारे समुद्रात दोघे पर्यटक बुडाले पैकी एकाला वाचवण्यात यश
रत्नागिरी जवळील आरे वारे मुद्रकिनारी पुन्हा एकदा दुर्दैवी घटना घडली आहे कोकणात फिरण्यासाठी आलेल्या दोघे पर्यटक बुडाले जीव रक्षकाने एकाला वाचवण्यात यश मिळविले दोघेही पनवेल येथील होते. त्यातील सिद्धार्थ विनायक फासे ( वय १९) या तरुणाचा मृत्यू झाला आहे.तर प्रविंद्र बिरादार यांना वाचिवण्यात स्थानिकांसह जिवरक्षकांना यश आले आहे. शनिवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली.रत्नागिरीच्या कोषागार कार्यालयात काही वर्षांपुर्वी कार्यरत असलेले व सध्या वसई-विरार महानगरपालिकेचे मुख्य लेखा परिक्षक विनायक फासे हे दि.१५ ऑगस्ट रोजी आपल्या कुटुंबासह फिरण्यासाठी रत्नागिरीत आले होते. शनिवारी दुपारी ते कुटुंबासमवेत आरे -वारे येथील समुद्र किनारी गेले होते.कुटुंब किनार्यावरती फिरत असतानाच त्यांच्या मुलगा सिद्धार्थ हा गुडघाभर पाण्यात उतरला.अशातच अचानक आलेल्या एका लाटेमुळे सिद्धार्थ पाण्यात ओढला गेले. प्रविंद्र बिरादार यांनी त्याला वाचविण्यासाठी पाण्यात धाव घेतली. त्याला जवळ ओढण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने सिद्धार्थ आता ओढला जात होता. सिद्धार्थला विचविताना प्रविंद्र बिरादार यांच्या श्वास गुदमरु लागल्याने ते पाण्यात कोसळले.याच कालावधित नातेवाईकांनी आरडाओरड केल्यानंतर स्थानिकांसह जिवरक्षक घटनास्थळी धावले. त्यांनी सर्व प्रथम प्रविंद्र बिरादार यांना पाण्याच्या बाहेर काढले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र पाण्याच्या प्रवाहात आत ओढला गेलेल्या सिद्धार्थचा मृत्यू झाला. त्याला जिवरक्षकांनी पाण्यातून बाहेर काढत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तो मृत असल्याचे वैद्यकिय अधिकार्यांनी घोषित केले.