मुंबई-कोकण महामार्ग पूर्ण होत नाही तोपर्यंत अन्य कोणताही हायवे कोकणात बनवू नये
मुंबई-कोकण महामार्ग पूर्ण होत नाही तोपर्यंत अन्य कोणताही हायवे कोकणात बनवू नये अशी भूमिका घेत जन आक्रोश समिती आक्रमक झाली आहे. राष्टीय महामार्ग पूर्ण व्हावा यासाठी आमरण उपोषण सुरू केले असून जो पर्यंत ठोस उत्तरे मिळत नाही, मुख्यमंत्री लेखी उत्तरे देत नाहीत तो पर्यंत माघार नाही, असा निर्धार जन आक्रोश समितीच्यावतीने व्यक्त करण्यात आलाआहे. या उपोषणाला समृद्ध कोकण संघटनेचे संजय यादवराव यांनीही पाठींबा दिला आहे. माणगाव येथे १५ ऑगस्ट रोजी सुरू केलेले हे आमरण उपोषण संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होते.