महाराष्ट्रातील निवडणुकीबाबतही निवडणूक आयोग काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष
निवडणूक आयोग आज दुपारी 3 वाजता एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहे. ज्यात जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. याशिवाय, हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखाही आज जाहीर होऊ शकतात. तसेच महाराष्ट्रातील निवडणुकीबाबतही निवडणूक आयोग काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जम्मू-काश्मीरमधून 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होणार आहेत.आयोगानं गेल्या आठवड्यातच जम्मू-काश्मीर आणि हरियाणाचा दौरा पूर्ण केला होता. निवडणूक आयोगाच्या सूत्रांवर विश्वास ठेवला तर, जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशात तीन ते चार टप्प्यात मतदान होऊ शकते.सप्टेंबरमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या महिन्याच्या अखेरीस निवडणुकीचा निकाल जाहीर होऊ शकतो. निवडणूक आयोगाच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात निवडणुका घेण्याच्या मार्गातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे सुरक्षा व्यवस्था. अलीकडच्या काळात अचानक वाढलेल्या दहशतवादी घटनांमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्याचा परिणाम निवडणूक कार्यक्रमावरही दिसून येतो.