‘प्र.ल.’ माहितीपट रविवारी सह्याद्री वाहिनीवर

नाट्यसृष्टीतील सुवर्णकाळ छोट्या पडद्यावर रत्नागिरी दि.१६ प्रतिनिधी ज्येष्ठ नाट्यलेखक कै.प्र.ल. मयेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त समर्थ रंगभूमी निर्मित ‘प्र.ल.’ हा माहितीपट रविवार दि.१८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होणार आहे.आतापर्यंत पाचव्यांदा ‘प्र.ल.’ माहितीपट सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होणार आहे.ज्येष्ठ नाट्यलेखक कै. प्र.ल. मयेकर यांचा दि.१८ ऑगस्ट रोजी नववा स्मृतिदिन आहे.१८ ऑगस्ट २०१५ रोजी प्र.ल. मयेकर यांचे निधन झाले.त्यानंतर २०१६ मध्ये पत्रकार दुर्गेश आखाडे आणि समर्थ रंगभूमी रत्नागिरी यांनी ‘प्र.ल.’ माहितीपटाची निर्मिती केली.’प्र.ल.’ हा माहितीपट आतापर्यंत चार वेळा सह्याद्री वाहिनीवर प्रसारित करण्यात आला.हा माहितीपट पहाण्याची आणखी एक संधी रसिक प्रेक्षकांना लाभणार आहे.रविवार दि.१८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता सह्याद्री वाहिनी वरून ‘प्र.ल.’ माहितीपट प्रसारित होणार आहे.’प्र.ल.’ माहितीपटाची संकल्पना आणि लेखन दुर्गेश आखाडे यांची आहे.माहितीपटाचे निवेदन अभिनेता अविनाश नारकर,प्रमोद पवार आणि अभिनेत्री मयुरा जोशी यांनी केले आहे.दिग्दर्शन श्रीकांत पाटील आणि दुर्गेश आखाडे यांनी केले आहे.छायाचित्रण अजय बाष्टे, संकलन धीरज पार्सेकर,पार्श्वसंगीत योगेश मांडवकर आणि ध्वनिमुद्रण उदयराज सावंत यांनी केले आहे.माहितीपटाचे निर्माते श्रीकांत पाटील आहेत. प्र.ल.’ यामाहितीपटात ज्येष्ठ नाटककार कै.प्र.ल.मयेकर यांच्या सोबत काम केलेले अनेक दिग्गज कलाकार पहायला मिळतात.त्यामध्ये ज्येष्ठ दिग्दर्शक कुमार सोहनी,अभिनेते अरूण नलावडे,चिन्मय मांडलेकर,निर्माते प्रसाद कांबळी,पटकथाकार कै.कांचन नायक,अभिनेत्री ऐश्वर्या नारकर,शीतल शुक्ल,माधवी जुवेकर,डॉ.रवी बापट,पद्मश्री वाघ आणि विशाखा सहस्त्रबुध्दे यांचा समावेश आहे.फोटोप्र.ल.मयेकर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button