चाळीतील एका खोलीतून शेकडो डी मार्ट स्टोअरची साखळी उभी करणारा अवलिया

राकेश झुनझुनवाला यांना भारतीय शेअर बाजार आणि एकूणच उद्योजक समुहात जाणते गुंतवणूकदार म्हणून मान होता. पण, तेच झुनझनवाला हे राधाकिशन दमानी यांना आपला गुरू मानत असत. राजस्थानच्या बिकानेरमध्ये जन्म झालेले राधाकिशन मुंबईत वाढले.*वडील दलाल स्ट्रिटवर एका शेअर दलालाकडे काम करायचे. राधाकिशन त्यांचा मोठा मुलगा. पण, वदे.xडील अचानक वारले. दमानी कुटुंबावर मोठं संकट कोसळलं. तेव्हा वाणिज्य शाखेत पदवी अभ्यासक्रम शिकत असलेल्या राधाकिशनला शिक्षण सोडावं लागलं. पहिल्याच वर्षी पदवी शिक्षण सोडलेल्या राधाकिशनने नंतर मात्र २,२०० कोटी अमेरिकन डॉलरचं साम्राज्य उभं केलं आहे. फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत त्यांनी भारतीय व्यावसायिकांमध्ये आठवं स्थान पटकावलं आहे. १९९० च्या दशकात वडिलांच्या मागून त्यांनी शेअर बाजारात प्रवेश केला. हर्षद मेहता ज्या शेअरवर त्या काळात बोली लावत होता, तिथेच पैसे गुंतवून पण, ते लगेच थोड्या थोड्या नफ्यावर काढून घेऊन मोठा पैसा मिळवला. इतका की, १९९५ मध्ये एचडीएफसी बँकेचा आयपीओ आला तेव्हा राधाकिशन दमानी या बँकेतील सगळ्यात मोठा खाजगी गुंतवणूकदार होते. अचूक उद्योग हेरणे आणि तो वाढवणे, त्यात गुंतवणूक करणे ही त्यांची हातोटी होती. १९९९ मध्ये त्यांनी नवी मुंबईत नेरुळ इथं अपना बाजारची एक फ्रँचाईजी चालवायला घेतली. पण, त्यांना कंपनीचं बिझिनेस मॉडेल आवडलं नाही. त्यामुळे अपना बाझारमधून बाहेर पडून त्यांनी लगेचच २००० मध्ये हायपर मार्केट साखळी सुरू करण्याचा घाट घातला. त्यालाच आता आपण डी-मार्ट म्हणून ओळखतो. २००२ साली पवईत त्यांनी आपलं पहिलं डी-मार्ट दुकान सुरू केलं. त्यात आधुनिकता आणली. पवई हा श्रीमंत मुंबईकरांचा भाग असल्यामुळे तिथे ही कल्पना लगेचच रुजली. त्यानंतर दमानी यांनी मागे वळून पाहिलं नाही. २०१० पर्यंत डी-मार्टची २५ दुकानं सुरू झाली होती. २०१७ मध्ये त्यांनी डी-मार्टचा आयपीओही बाजारात आणला. २०२० मध्ये ते फोर्ब्सच्या यादीत अब्जाधीश म्हणून पहिल्यांदा झळकले. तेव्हा त्यांची संपत्ती १६.५० अब्ज अमेरिकन डॉलर इतकी होती. आणि भारतातील ते चौथ्या क्रमांकाचे उद्योगपती होते. आता फोर्ब्सची ताजी यादी पाहिली तर त्यांची एकूण मालमत्ता २,२०० कोटी अमेरिकन डॉलर इतकी आहे. भारतातील ते आठव्या क्रमांकाचे श्रीमंत आहेत. तर जागतिक स्तरावर त्यांचा क्रमांक आहे ८७ वा. २०२१ मध्ये दमानी यांनी मुंबईच्या मलबार हिल भागात अकरा निवासी घरं विकत घेऊन लक्ष वेधलं होतं. १,००० कोटी रुपयांचा व्यवहार होता. ही घरं एकत्र जोडून ते आपल्या कुटुंबीयांबरोबर इथं राहतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button