गणपतीत गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी भाजपकडूनमुंबई महानगरातून तब्बल 700 बसेस आणि 6 ट्रेनचे नियोजन

विधानसभा निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी धावपळ सुरु आहे. कोणी जिल्ह्यांमध्ये जाऊन प्रचार दौरे करत तर कोणी योजना जाहीर करतंय.राज्यात सत्तेत असलेल्या भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी सरकारने नुकतीच लाडकी बहीण योजना जाहीर केली. महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान भाजपकडून कोकणी मतदाराना खूष करण्यासाठी महा मेगा प्लॅन आखण्यात आलाय.विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोकणी मतदारांना खुश करण्यासाठी भाजपचा महा मेगा प्लॅन आणला आहे. गणपतीत गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी भाजपकडून विशेष बस आणि रेल्वे सोडण्यात येणार आहेत. मुंबई महानगरातून तब्बल 700 बसेस आणि 6 ट्रेनचे नियोजन करण्यात आले आहे. लवकरच बस आणि ट्रेनच्या बुकिंगला भाजप कार्यालयात सुरुवात होणार आहे. मुंबईत कोकणी मतदारांचा आकडा मोठा आहे.याच मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपाकडून सर्वाधिक बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे. वांद्रे पश्चिम विधानसभा क्षेत्रात बॅनर लागले आहेत. या बॅनरवर आशिष शेलार यांचा मोठा फोटो लावण्यात आला आहे. तसेच मोदी, शहा, फडणवीस, बावनकुळे यांच्यासोबत उज्ज्वल निकम यांचा फोटोदेखील दिसतोय.बॅनरवर दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतून रायगड आणि पुढे कोकणातील चाकरमान्यांसाठी ही सेवा असणार आहे. 20 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2024 या कालावधीत चाकरमान्यांना अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज करतावेळी निवडणूक ओळखपत्र आणि आधार कार्डची खरी आणि झेरोक्स प्रत सोबत आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खार पश्चिम येथून या बस सुटणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button