कुणी मायचा लाल तुमच्या अकाऊंटला गेलेला पैसा परत घेऊ शकत नाही. त्यांच्या हातात काय देवळात वाजवायची घंटा आहे का?- अजित दादा पवार

लाडकी बहीण योजनेवरुन केलेल्या वक्तव्यामुळे महायुतीतील अपक्ष आमदार रवी राणा यांना अजित पवार यांनी चांगलेच झापलं आहे. महायुतीतील महाभाग बोलतात पैसे परत घेऊ, त्यांच्याकडे मंदिरातील घंटा आहे का, असे अजित पवार म्हणाले.लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक सहाय्य देण्याचे उद्दिष्ट आहे. परंतु, रवी राणा यांच्या वक्तव्यामुळे या योजनेवरून विवाद निर्माण झाला आहे. अजित पवार यांनी यावर ठाम भूमिका घेतली असून, महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे या वादामुळे महायुतीतील तणाव वाढला आहे.मी माझ्या माय माऊलींना सांगतो, कुणी मायचा लाल तुमच्या अकाऊंटला गेलेला पैसा परत घेऊ शकत नाही. त्यांच्या (रवी राणा) हातात काय देवळात वाजवायची घंटा आहे का? १७ तारखेला महाराष्ट्रातील माय माऊलींच्या कमीत कमी एक कोटी महिलांच्या खात्यावर पैसे जमा होतील. हा दिलेला शब्द आहे. आपण शब्दाचा पक्का आहे. हा अजितदादाचा वादा आहे,” असे अजित पवार म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button