हिपटायटिस बी लसीची मोठी टंचाई
हिपटायटिस बी या लसीची मोठी टंचाई महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यांमध्ये उदभवली आहे. हिपटायटटीससाठी लसीकरण करून घेण्यासाठी आरोग्य खात्याच्या पुढाकाराने व्यापक जनजागृती केली जात असताना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लस टंचाई निर्माण झाल्याने अनेक रूग्णांसमोर प्रश्न उपस्थित झाला आहे.खासगी तसेच सरकारी रूग्णालयांसमोर हिपटायटीस बी लसीची टंचाई असल्यामुळे उपचार व्यवस्था अडचणीत सापडली आहे. काही रूग्णांना शस्त्रक्रियेपूर्वी ही लस देणे आवश्यक असते. परंतु त्यांना ती देता येत नाही. जाणकारांच्या म्हणण्यानुसार लसनिर्मितीला कच्च्या मालाच्या कमतरतेचा मोठा फटका बसत आहे. www.konkantoday.com