शाहिरीतून अश्लीलता सादर करणार्यांवर निर्बंध
शाहिरी हे समाज प्रबोधनाचे माध्यम आहे. मात्र शाहिरी कला सादरीकरण करताना गाण्यातून अश्लीलता सादर करणार्यांवर कडक निर्बंध घालण्याचा निर्धार अनादी सिद्ध शक्ती-तुरा समाज शाहीर संघाच्या वर्धापन दिन सोहळ्याप्रसंगी करण्यात आला. तसेच शाहिरी कलाकारांसाठी राजापूर येथे स्वमालकीचे शाहिरी भवन बांधण्याचा संकल्पही या निमित्ताने करण्यात आला.अनादी सिद्धी शक्ती-तुरा समाज शाहीर संघ राजापूर या मंडळाचा वधांपन दिन हातिवले येथील श्री देवदत्त मंदिर येथे मंडळाचे संस्थापक गुरूवर्य विश्वनाथ उर्फ भाई गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक कोल्हापूर कणेरी मठ येथील नामवंत शाहिर बळवंत चव्वणाण हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून अनेक ज्येष्ठ शाहिरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सद्य स्थितीत राजापूर तालुक्यातील लहान मुले ही शिक्षणानिमित्त मुंबईस्थित असल्याने जाखडी नृत्य कला सादर करताना मुलांची उणीव भासते. परिणामी जाखडी नृत्य कला ग्रामीण भागात जीवंत ठेवण्यासाठी साधारण १२ ते १३ वयोगटातील मुलींना नृत्यपथकात नृत्य करण्यासाठी सहभाग देण्यात यावा, असा निर्णयही यावेळी घेण्यात आला. www.konkantoday.com