
खासदार विनायक राऊत यांच्या आडमुठी धोरणामुळे मुंबई-गोवा महामार्गाला विलंब ,राऊत म्हणजे निष्क्रिय खासदार-भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार
रत्नागिरी-सिंधुुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत यांच्या आडमुठी धोरणामुळे मुंबई-गोवा महामार्गाला विलंब झाला. आपल्या मुलाबाळांना टोल वसुलीची कंत्राटे मिळविण्यासाठी त्यांनी काम केले. तसेच रिफायनरीला विरोध करून कोकणातील लाखो तरूणांचा रोजगार त्यांनी बुडविला. एकप्रकारे विनायक राऊत हे निष्क्रिय खासदार असून त्यांनी कोकणाचे मोठे नुकसान केले असा घणााघती प्रहार भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी केला.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चद्रकांत बावनकुळे हे १९ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी व सिंधुदुर्ग दौर्यावर येत आहेत. त्यानिमित्त शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रमोद जठार बोलत होते. येणार्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे हे दौर्यावर येत असून त्यानिमित्त जठार यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर तोफ डागली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला विरोध करण्याचे काम देखील राऊत यांनी केले. मागील अडीच वर्षात केंद्राच्या विविध योजना विनायक राऊत यांच्यामुळे जनतेपर्यंत पोहोचू शकलेल्या नाहीत असे जठार यांनी सांगितले.
www.konkantoday.com