बाप्पाच्या रंगकामात मूर्तीकार व्यस्त
लाडक्या बाप्पाचे आगमन काही दिवसांवर आले असताना गणेशमूर्ती शाळेत रंगकामाच्या कामाने कमालीची गती घेतली आहे. रंगकाम पूर्ण करण्यासाठ कामगार दिवस-रात्र मेहनत घेत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे यंदा शाडू मातीचा दर १० टक्क्याने वाढल्याने परिणामी गणेशमूर्ती कारखानदारांना पुन्हा एकदा महागाईचा फटका बसला आहे. सहाजिकच याचा थेट परिणाम गणेशमूर्तीच्या दरावर होणार आहे.वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या गणेशोत्सव आणि कोकण हे एक समीकरण आहे. गणेशोत्सवाला काही अवधी शिल्लक असला तरी लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी तयारीला गणेशभक्तांची आतापासूनच लगबग सुरू झाली आहे. ठिकठिकाणी याचे नियोजन सुरू झाले आहे. येथील बहुतांशी गणेशभक्तांकडून घरगुती स्वरूपातील गणेशमूर्ती बसवल्या जातात. शाडू मातीपासून बनवलेल्या लालबागचा राजा, बालगणेश, अष्टविनायकातील सर्व रूपे अशा अनेक मूर्तीना विशेष मागणी आहे.www.konkantoday.com