
जुलैचे रखडलेले धान्य ३१ ऑगस्टपर्यंत मिळणार
रेशन धान्य वाटपाच्या सर्व्हरमधील समस्या अजूनही कायम असल्याने जुलैतील शिल्लक राहिलेले धान्यवाटप आता ३१ ऑगस्टपर्यंत करण्याची मुभा राज्य सरकारने दिली आहे. ही मुदत यापूर्वी १५ ऑगस्ट होती. धान्यवाटप करताना ऑनलाईन अर्थात अंगठा ही सुविधा केवळ जुलैसाठीच असल्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे धान्य न मिळालेल्या ग्राहकांना आता जुलै महिन्याचे धान्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.राज्यात बहुताशी ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यामुळे अन्नधान्य वितरण सर्व्हरमध्ये अडचणी आल्याचे राज्य शासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातील अन्नधान्य वितरणावर विपरित परिणाम झाला. रत्नागिरी जिल्ह्यातही सर्वच तालुक्यातील रेशन धान्य वाटप अजून शिल्लक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हजारो ग्राहकांना धान्यापासून वंचित रहावे लागले.www.konkantoday.com