विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठी राजकीय घडामोड; काँग्रेसचे २ आमदार होणार शिंदे गटात सामील?
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर यांनी मंगळवारी रात्री उशिरा या दोन्ही आमदारांनी एकनाथ शिंदेंची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. लवकरच ते काँग्रेसला रामराम ठोकून शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. क्रॉस वोटिंग कारवाईच्या आधीच ते पक्षाला रामराम ठोकणार आहेत.त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून या दोन्ही आमदारांवर कारवाई होणार आहे. या कारवाईपूर्वीच हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकरांनी शिंदे गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे लवकरच ते शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.