लांजा आसगे तळवडे दाभोळे मार्गावरील चिरे वाहतुक त्वरित बंद करण्याचे आदेश देण्यात यावेत, अजित यशवंतराव यांची मागणी
लांजा आसगे तळवडे दाभोळे मार्गावरील चिरे वाहतुक त्वरित बंद करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव यांनी केली असून याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर केले आहे .लांजा आसगे तळवडे दाभोळे मार्गावर गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात चिरे वाहतूक सुरू आहे. सापुचेतळे येथून घाट माथ्यावर होणार्या चिरे वाहतुकीमुळे लांजा तळवडे दाभोळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून वाहतुकीसाठी अतिशय धोकादायक बनला आहे. यापूर्वी या रस्त्यावर वारंवार अपघात झालेले आहेत. तर यापूर्वी अपघातात दोघांचा मृत्यू झालेला आहे. सोमवारी १२ ऑगस्ट रोजी रात्री याच मार्गावर तळवडे रेल्वे फ्रिज येथे झालेल्या अपघातात आणखी दोघांचा बळी गेला आहे .अशाप्रकारे सातत्याने होणाऱ्या चिरा वाहतुकीमुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले असून संपूर्ण रस्ता तळवडे, आसगे , कुरचुंब येथील जनतेसाठी हा मार्ग धोकादायक बनला आहेआसगे तळवडे दाभोळे या मार्गावर सुरू असणारी चिरे वाहतूक लोकांच्या जीविताला धोकादायक ठरणारी असून या मार्गाने सुरू असलेली चिरे वाहतूक तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात यावे. अन्यथा आम्हाला लोकांच्या जीविताच्या दृष्टीने वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा देखील आजित यशवंतराव यांनी या निवेदनातून दिला आहे