
मुलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी स्वतः कशी घ्यावी या बाबत डॉ.परशुराम निवेंडकर यांचे मार्गदर्शन…
प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड अंतर्गत पूर्ण प्राथमिक शाळा चाफे नंबर एक येथे दहा वर्ष वयोगटातील मुलांना इंजेक्शन डीटी चे डोस देण्यात आले या वेळी मुलांना मार्गदर्शन करण्यात आले त्या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड चे आरोग्य सहाय्यक डॉ परशुराम निवेंडकर यांनी मार्गदर्शन केले हात धुण्याची पद्धत ते वैयक्तिक स्वच्छ्ता पोषण आहार आणि पावसाळ्यात घ्यावयाची काळजी या वर त्यांनी मुलांना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कडवेकर यांनी सर्वांचे स्वागत केले या वेळी शाळेतील शिक्षक विद्यार्थी तसेच आरोग्य उपकेंद्र धामनसे च्या cho श्रीम. गीतांजली मायशेट्ये, आरोग्य सेविका श्रीम. जयश्री सावंत, आशा सेविका, मदतनीस, तसेच अंगणवाडी सेविकांना उपस्थित होत्या .