बॅंकेच्या क्रेडिट कार्डवरुन दीड ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या अज्ञात संशयिताविरुद्ध रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
बॅंकेच्या क्रेडिट कार्डवरुन दीड लाखाची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या अज्ञात संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १४ जुलैला साडेपाचच्या सुमारास रत्नागिरी शहरातील सावंत प्लाझा बोर्डिंग रोड, देसाईचाळ, रत्नागिरी येथे घडली.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी हे घरी असताना त्यांच्या मोबाईल क्रमांवर असलेले रिवॉर्ड रिडीम करण्यासाठी आलेल्या टेक्स मेसेज मधील लिंकवर त्यांनी क्लिक केले असता ॲक्सीस बॅकेंच्या इंटरनेट बॅकिंगसारखे पेज ओपन झाले. फिर्यादी यांनी त्या पेज मधील कॉल प्रमाणे त्यांच्या ॲक्सीस बॅकेच्या क्रेडीटची माहिती भरत गेल्यानंतर त्यांच्या ॲक्सीस बॅंकेच्या क्रेडिट कार्डवरुन अज्ञाताने १ लाख ५० हजार रुपये डेबीट झाले. कोणीतरी अज्ञाताने फिर्यादी यांची फसवणूक केली असल्याचा दावा फिर्यादी यांनी केला. या प्रकरणी फिर्यादी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.