नितेश राणे हा शेंबड पोर त्याला महत्व देऊ नका-एमआयएमचे नेते इम्तियाज जलील
राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांबाबत आक्षेपार्ह भाषा वापरणारे भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी आगपाखड केली आहे. नितेश राणे हा शेंबड पोट त्याला महत्व देऊ नका.चांगला पोलीस अधिकारी असता त्याला मारलं असतं.राज्यात काही कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही? नितेश राणेंपेक्षा घाण मी बोलू शकतो. तो सकाळी उठला की हिंदू हिंदू करतो. त्याला पोलिसांनी थोबाडीत मारली पाहिजे होती, असे इम्तियाज जलील यांनी म्हटले.नितेश राणे यांनी मंगळवारी सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या शिवशक्ती-भिमशक्ती जनआक्रोश मोर्चाच्या व्यासपीठावरुन पोलीस अधिकाऱ्यांना इशारा दिला होता. सरकार हिंदूंचे आहे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात पाठवू की जिथून तुमच्या बायकोलाही फोन लागणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता. मी काही निवेदन वगैरे देत बसत नाही, ती भाषा मला जमत पण नाही. मी डायरेक्टकार्यक्रम करतो. पोलिस ठाण्यात लव्ह जिहाद बाबत तक्रार देण्यात येणाऱ्या मुलीची तक्रार अर्ध्या तासात घेतली पाहिजे, अन्यथा पुढच्या तीन तासात पोलिस ठाण्यात दाखल होऊन धिंगाणा घालू, असे नितेश राणे यांनी म्हटले होते.नितेश राणे यांच्या या वक्तव्यावरुन प्रचंड गदारोळ झाला होता.